शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित

By admin | Updated: May 1, 2017 00:34 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज रविवारी मनपा सभागृहात निवडणूक पार पडली.

फुलझेले उपमहापौर : घोटेकर यांना ४२ तर रंजना यादव यांना २४ मतेचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज रविवारी मनपा सभागृहात निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या अंजली घोटेकर यांना ४२ तर बसपाच्या रंजना यादव यांना २४ मते प्राप्त झाल्याने अंजली घोटेकर यांना महापौर म्हणून घोषित करण्यात आले. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले.चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ एप्रिलला मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यानंतर महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने अंजली घोटेकर आणि उपमहापौर पदासाठी अनिल फुलझेले यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने अंजली घोटेकर याच चंद्रपूरच्या तिसऱ्या महापौर बनणार हे निश्चित झाले होते. मात्र घोटेकर यांच्यासोबतच बसपाच्या रंजना यादव यांनीही महापौर पदासाठी आपले नामांकन दाखल केल्याने प्रशासनाला निवडणूक घ्यावी लागली. यासाठी आज मनपाच्या सभागृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका फेटे धारण करून सभागृहात दाखल झाले. काँग्रेसचे १२ आणि इतर पक्षाचेही नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यानंतर महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि मनपाचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हात उंचावून निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी महापौर पदासाठी भाजपाच्या अंजली घोटेकर यांचे नाव घेताच ४२ सदस्यांनी आपले हात उंचावून घोटेकर यांना मतदान केले तर रंजना यादव यांना २४ जणांनी मतदान केले. मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोटेकर यांना मतदान केले, हे विशेष. ही मते बघता पिठासीन अधिकारी आशुतोष सलिल यांनी अंजली घोटेकर यांना महापौर घोषित केले. उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना निवडणूक न घेताच उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले. महापौर व उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर आ. नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेपासून भाजपाच्या वतीने विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टूवार, वसंत देशमुख, संदीप आवारी, माजी महापौर राखी कंचर्लावार, संजय कंचर्लावार, राहुल पावडे, राजेंद्र अडपेवार, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे, वंदना जांभूळकर, रवी आसवानी, अंकूश सावसाकडे, जयश्री जुमडे, पुष्पा उराडे, राहुल घोटेकर, छबु वैरागडे, देवानंद वाढई, आशा आबोजवार, प्रशांत चौधरी, अनुराधा हजारे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)स्थायी समितीसदस्यांची निवडमनपातील स्थायी समिती सदस्यांचीही आज निवड करण्यात आली. भाजपाच्या वतीने दहा, बसपाकडून दोन, काँग्रेसकडून तीन तर शहर विकास आघाडीकडून एका सदस्याचे नाव स्थायी समितीसाठी पाठविण्यात आले. यात १६ सदस्यांची निवड करण्यात आली. शहराचा विकास साधणार शहरातील नाल्यांची अवस्था वाईट आहे. मोकळ्या जागेतही घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे प्रथम याकडे प्राधान्याने लक्ष देऊन शहर सौंदयीकरणावर भर दिला जाईल. ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर व आ. नाना श्यामकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास साधणार.-अंजली घोटेकर,नवनियुक्त महापौर, चंद्रपूर.