सल्लागार समितीचा निर्णय : विजय वडेट्टीवार यांनी घेतली बैठक सिंदेवाही : घोडाझरी सिंचाई मध्यम प्रकल्प सल्लागार समितीची सभा ब्रह्मपुरी क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये घोडाझरी मध्यम प्रकल्पाचे पाणी सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामात धान रोवणीकरिता २४ आॅगस्ट पर्यंत सोडण्यात यावे किंवा नहराचे हंगामपूर्व कामे पूर्ण करुन त्या अगोदर सुद्धा पाणी सोडल्यास हरकत नसल्याबाबत निर्णय घेण्यात आला. घोडाझरी मध्यम प्रकल्प अंतर्गत गोविंदपूर व नवरगाव शाखा आहेत. दोन शाखे अंतर्गत व्यवस्थापन कर्मचारी व कालवा निरीक्षक मिळून १३ पदे मंजूर आहेत. सद्यास्थितीत १ कालवा निरीक्षक कार्यरत असून १२ पदे रिक्त असल्यामुळे पाणी वाटपाची कामे करुन घेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती घोडाझरी पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता एम.एन. रिजवी यांनी सल्लागार समितीच्या सभेत दिली. या सभेत आ. विजय वडेट्टीवार यांनी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून यावर्षीच्या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना नहराद्वारे पाणीपुरवठा करण्याची व निरीक्षण गृहासमोरील बगीचा तयार करण्याकरिता अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना केली. या सभेला सल्लागार समितीचे सदस्य चक्रधर सोनवाने (गिरगाव) रहेमान शेख (नांदेड) पंचम खोबरागडे (वलनी), रामचंद्र गहाणे (रत्नापूर) विश्वनाथ कामडी (अंतरगाव), तालुका कृषी अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते. (पालक प्रतिनिधी)
रोवणीसाठी सोडणार घोडाझरी तलावाचे पाणी
By admin | Updated: August 19, 2016 01:56 IST