शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने विदर्भ मिळवा!

By admin | Updated: September 23, 2016 01:07 IST

वेगळ्या विदर्भाची लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपली शक्ती आणि आंदोलनाची गती पाहून

वामनराव चटप : विदर्भवाद्यांचा मेळावाचंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपली शक्ती आणि आंदोलनाची गती पाहून विदर्भद्रोही चवताळले आहेत. त्यांचा संयम सुटत चालला आहे. ते आपल्यावर हल्ले करायला लागले आहेत. आपल्या सभा उधळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्या मुकाबला आपल्याला संघटित राहुन करावयाचा आहे आणि विदर्भ मिळवायचा आहे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात विदर्भवाद्यांच्या मेळाव्यात अ‍ॅड. चटप बोलत होते. हा मेळावा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विदर्भराज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, विदर्भ आझाद काँग्रेसचे अध्यक्ष अय्युबभाई कच्छी, नीळकंठराव कोरांगे, नितीन भागवत, प्रा. एस. टी. चिकटे, प्रभाकरराव दिवे, अशोक मुसळे, सीपीआयचे अनंता येरणे, डॉ. नामदेवराव कन्नाके आदींनी मार्गदर्शन केले. मंचावर प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष थोरात, प्रवीण मोरे, गोपी मिक्षा, कपिल इद्दे, रवींद्र गोखरे, अ‍ॅड. शरद कारेकार, मारोतराव काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार यांनी केले आणि संचालन सचिन आक्केवार यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सूरज गावंडे, सोनल येरेवार, अनुराधा बिर्लाबल, मंगला माडोरे, सुनील पानपट्टे, स्वप्निल नरूले, अमोल नेदुनवार, शांताराम पानघाटे, योगेश जाफराबादी, गोपी भानारकर, अनिकेत शेंडे, खेमराज उमरे, सूरज माडुरवार, शुभम डोंगरे, सागर यादव, अरशद कच्छी आदींनी परिश्रम घेतले. अखेरीस विदर्भवाद्याना शपथ दिल्यानंतर मेळाव्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)