शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या हक्कासाठी संघटित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:45 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना व रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो.

ठळक मुद्देसंजय मंडवधरे : बांधकाम कामगारांचा ब्रह्मपुरीत मेळावा

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना व रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. परंतु प्रशासनाने या बाबत पाहिजे त्या प्रमाणात प्रत्यक्ष कामगारांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला नाही. परिणामी हजारो कामगार लाभापासून वंचित आहेत. या बांधकाम कामगारांना जागृत करून त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी या तालुकास्तरीय नोंदणी मेळावा शुक्रवारी येथे पार पडला.कामगारांनी आपला हक्क मिळविण्यासाठी कल्याणकारी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करावी व संघटित होवून संघटनात्मक संघर्ष करण्याचे आवाहन बांधकाम कामगार संघटनेचे राज्य महासचिव संजय मंडवधरे यांनी केले.आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी येथे कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपूलवार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष संतोष दास, संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव नखाते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.बांधकाम कामगारांसाठी आयटक संघटना सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करून सरकारशी भांडत आहे. शेवटी सरकारला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी बोर्ड स्थापन करावे लागले व या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. पण बांधकाम कामगार संघटित नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांची माहिती नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी त्वरित करून संघटनेच्या माध्यमातून अनेक योजना मिळविण्यासाठी संघर्ष करावा, असे डॉ. महेश कोपुलवार यांनी सांगितले.नोंद होणाऱ्या व यापूर्वी नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे मंडळाने जाहीर केले आहे. मिस्त्री, गवंडी, बिगारी, सेंट्रींगवाले, खुदाईवाले, पेंटर, प्लंबर, सुतार, फरशी फिटर, फेब्रीकेटर, इलेक्ट्रिक फिटर, वेल्डर, विटाभट्टी कामगार यांना लाभ मिळणार आहे.