शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान वाचविण्यासाठी संघटित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:13 IST

आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले.

ठळक मुद्देअशोक सोनाने : भारिपचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले.स्थानिक राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात भारिपचा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा सत्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सर्व पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारिपचे सरचिटणीस अमित भुईगळ, महासचिव कुशाल मेश्राम, आ. बळीराम शिरस्कर, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, सचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.यावेळी भारिपचे सरचिटणीस अमित भुईगळ म्हणाले, जनता भाजप, सनेच्या सत्तेला कंटाळली असून तिसरा पर्याय म्हणून भारिपकडे वळत आहे. त्यामुळे आपणाला पक्ष संघटन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.आ. सिरस्कर यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळेच देशातील शोषित, पीडित जनता सन्मानाने जीवन जगत आहेत. मात्र सरकारच्या नव्या ध्येय धोरणामुळे जनसामान्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता आपले सरकार बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षसंघटन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.भारिपचे महासचिव कुशल मेश्राम म्हणाले, राज्याच्या महासचिव पदी माझी नेमणूक करुन माझ्यावर माजी खा. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. तर पक्षवाढ करण्यासाठी आपण प्रयत्नरत असून जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी भारिपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक सोनाने, सरचिटणीस अमित भुईगळ, महासचिव कुशाल मेश्राम, महासचिव आ. बळीराम शिरस्कर या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रपूर जिल्हा महासचिव धिरज बांबोळे, संचलन सुभाष ढोलणे तर उपस्थिताचे आभार जे.जे.नगारे यांनी मानले. यावेळी कपूरदास दुपारे, डॉ. विलास मैद, सुरज गावंडे, रमेश ढेंगरे, सुमित मेश्राम, राजाभाऊ किर्तक, कल्पना अलोणे, राखी रामटेके, धिरज तेलंग, मिथून खोब्रागेड आदी उपस्थित होते.