शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांच्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देणार

By admin | Updated: February 28, 2016 01:04 IST

इतर कोणत्याही प्राणिमात्रात नाही इतकी प्रचंड कल्पकता महिलांमध्ये आहे. त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती महिला करताना दिसतात.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरात हिराई महोत्सव २०१६ चे उद्घाटन चंद्रपूर : इतर कोणत्याही प्राणिमात्रात नाही इतकी प्रचंड कल्पकता महिलांमध्ये आहे. त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती महिला करताना दिसतात. महिलांच्या या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे महिला स्वयंसहायता गटाच्यावतीने उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, पंचायत समिती सदस्य अविनाश पाल आदी उपस्थित होते.बांगला देशात बचत गटाची चळवळ फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. भारतातसुध्दा या चळवळीने वेग घेतला आहे. महिला या गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करीत आहे. महिलांची कल्पकता बचत गटाव्दारे निर्मित वस्तूंच्या माध्यमातून दिसून येत आहे. या महिलांच्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या समृध्द होतील, यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे, ना. मुनगंटीवार म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्गदर्शिकेचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले. संचालन सुलक्षणा गायकवाड यांनी तर आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपअभियंता कपाट यांनी मानले. प्रदर्शनात अनेक बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला असून २ मार्च पर्यंत चालणाऱ्या हिराई महोत्सवात बचत गटाव्दारे निर्मित विविध वस्तुंचे स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्ह्यात मॉल उभारणारजिल्ह्यात बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंचा चांगला मॉल उभा राहावा, असा आपला मनोदय असून त्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्यास उत्तम दजार्चा मॉल उभारु. या ठिकाणी बचत गटांना स्वस्त दरात जागा उपलब्ध करुन दिल्या जाईल. यासाठी येत्या सहा महिन्याचा भूमिपूजनाचा मुहूर्त समोर ठेवून काम करावे, असे अधिकाऱ्यांना ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी बचत गटांना राजमाता जिजाऊ पुरस्काराचे तसेच काही बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.