शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी योजना घराघरात पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:05 IST

राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आगामी निवडणुकींना सामोरे जात असताना सरकारकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिवती व कोरपना येथे अभ्यास वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आगामी निवडणुकींना सामोरे जात असताना सरकारकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. त्या योजना समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.कोरपना येथील ओम मंगल कार्यालय व जिवती तालुक्यातील टेकाअजुर्नी शिवमंदिराजवळ भाजपा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकारी यांचा अभ्यास वर्ग पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा पुर्व विदर्भ प्रभारी श्रीकांत देशपांडे, लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघुजी गेडाम आदी उपस्थित होते.राज्य व केंद्र सरकार शतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले असुन गृहीणींना चुलीपासुन मुक्त करण्यासाठी उज्वला योजना, प्रत्येक घरात विज कनेक्शन पोहचावे यासाठी सौभाग्य योजना, गरजुंना स्वस्त दरात औषध उपलब्ध व्हावेत यासाठी अमृत योजना यांसारख्या अनेक योजना यशस्वी सुरू आहेत. या योजना समाजाच्या शेवटपर्यंत पोहचाव्या यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन ना. अहीर यांनी केले.अभ्यास वगार्ला जिवतीचे तालुका अध्यक्ष केव गिरमाजी, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, जि. प. सदस्या कमला राठोड, नगराध्यक्ष पुष्पा नैताम सोयाम, गटनेते अमर राठोड, कोरपना प. स. सदस्य नुतन जिवणे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, सुरेश केंद्रे, रमेश मालेकर, सचिन डोहे, राजेश राठोड, संजय मुसळे, कवडु जरिले, अरूण मडावी, जया धारणकर, सविता पेटकर, हितेश चव्हाण, विशाल गज्जलवार, गोपिनाथ चव्हाण यांच्यासह बुथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.