शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाºयांच्या समितीकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:57 IST

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात....

ठळक मुद्देऔषधांचा तुटवडा पडू देऊ नका : बायोमेट्रिक यंत्रणा लावण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात गठित केलेल्या चौकशी समितीने बुधवारी रुग्णालयाची आकस्मिक पाहणी करून व्यवस्थेचे निरीक्षण केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू नये तसेच सर्व कर्मचाºयांच्या बायोमेट्रिक उपस्थितीसाठी यंत्रणा लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवा ही राज्यातील प्रगत रुग्णसेवा झाली पाहिजे, यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी, मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा, यासाठी उपाय योजनांसाठी ही समिती काम करणार आहे.बुधवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात जि.प.चे मुख्य कार्यकारी जितेंद्र पापळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकरी एम.आर.दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुनघाटे, डॉ.बेंडले यांच्या चमूने पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकाºयांनी बाह्यरूग्ण विभाग, प्रसूती विभाग, नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू), औषधी पुरवठा विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाला औषधांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी चालू आर्थिक वर्षाचे व पुढील वर्षाचे नियोजन करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाºयांनी केली. प्रसंगी स्थानिक स्तरावर यासाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना दिले.विविध समस्यांवर चर्चाजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व ज्येष्ठांच्या अतिदक्षता विभागाची स्थिती, या ठिकाणी रात्री व दिवसा काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणाºया सोईसुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणाºया सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती, या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम अशा आदी विषयावर या समितीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली.