शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:50 IST

चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

ठळक मुद्देजमिनीवर झोपवून उपचार : रुग्णसंख्या वाढली; मात्र सक्षम यंत्रणेचा अभावच

नरवी जवळे, परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कार्यरत डॉक्टर आपापल्या विषयात तज्ज्ञ आहेत, यात शंका नाही. मात्र सक्षम यंत्रणेचा अभाव असल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. चक्क जमिनीवर चादर टाकून, तिथेच रुग्णाला उपचार करवून घ्यावा लागत आहे.औद्योगिकीकरणामुळे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे. लोकसंख्येने जिल्हा मोठा आहे. वाढत्या उद्योगांमुळे अलिकडच्या काळात विविध आजारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी त्या दृष्टीने चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यापही प्रशस्त व सर्व सोई-सुविधायुक्त झालेले नाही. या सामान्य रुग्णालयात सध्या ३२० खाटा उपलब्ध आहेत. दररोज ४०० ते ५०० रुग्णांना या दवाखान्यात अ‍ॅडमीट करावे लागते. ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याचे रेकॉर्डवरून समजते.खाटा कमी असल्याने सहाजिकच एका खाटेवर दोन-दोन रुग्णांना ठेवले जात आहे. आधीच वेदनेने विव्हळत असलेला रुग्ण आरोग्य विभागाच्या अशा समायोजनेमुळे आणखी त्रस्त होत आहे. अनेक रुग्णांना तर बेडही मिळत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर लोकमत चमूने आज शुक्रवारी रुग्णालयात फेरफटका मारला. यावेळी स्थिती विदारक असल्याचे दिसून आले. अनेक रुग्ण जमिनीवर चादर टाकून उपचार करताना दिसून आले. एका रुग्णाला तशाच अवस्थेत सलाईन लावून ठेवण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोय तोकडी असल्याचे अनेक रुग्णांच्या नातलगांनी लोकमतशी बोलताना सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेकांवर वेळीच उपचारही मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावल्याचा घटना होत आहेत.रुग्णालयाच्या भिंती रंगलेल्याजिल्हा सामान्य रुग्णालयातील भिंती मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत. रुग्णालयात येणाºया रुग्णासोबत असणारे नातेवाईक खर्रे खाऊन रुग्णालयात वावरत असतात. मात्र याकडे कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते रुग्णालयात थुंकत असतात. त्यामुळे रुग्णालयातील संपूर्ण भिंती रंगलेल्या दिसून आल्या.माहिती देण्यास टाळाटाळचंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याबाहेरुन अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा येत असतात. मात्र रुग्ण, त्याचा आजार याविषयी काही माहिती विचारण्यास गेले असता कर्मचारी व येथील अधिकारी वर्ग टाळाटाळ करतात. कुणाचा कुणाला मेळ नसतो. त्यामुळे नातेवाईकांना कुणाला माहिती विचारावी, याबाबत सभ्रम निर्माण होत असते.औषधांचा अभावमोफत उपचार मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्हाभरातील अनेक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यातही येतो. मात्र अपुºया औषधसांठ्यामुळे बरेचदा रुग्णांना पैसे खर्च करुन बाहेरच्या मेडीकलमधून औषधी खरेदी करावी लागते. त्यामुळे रुग्णांंना आर्थिक फटका बसत असतो.नातेवाईकांसाठी व्यवस्थाच नाहीरुग्णालयात रुग्णासोबत त्याचे नातलगही येतात. मात्र रुग्णालयात केवळ एकालाच राहण्याची परवानगी दिली जाते. रुग्णासोबत असणाºया इतर नातेवाईकांना बाहेरच राहावे लागते. झाडाखाली किंवा जमिनीवरच त्यांना झोपावे लागते.दररोज रुग्णालयात दीड ते दोन हजारांच्या जवळपास रुग्ण येत असतात. त्यापैकी ४०० ते ५०० रुग्ण भरती असतात. त्यामुळे बहुतेक रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाही. तरीसुद्धा आम्ही रुग्णांवर तत्परतेने उपचार करीत असतो.- डॉ. यू. व्ही. मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.