शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

By admin | Updated: March 9, 2017 00:52 IST

नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ३ ते ५ मार्च या कालावधीत वर्धा येथे पार पडले.

चंद्रपूर : नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ३ ते ५ मार्च या कालावधीत वर्धा येथे पार पडले. या स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांचा तसेच नागपूर आयुक्त कार्यालयातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.स्पर्धेत विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या चमूने कबड्डी, खो-खो, महिला थ्रो-बॉल याप्रमाणे सांघिक खेळात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तसेच बॅटमिटन, जलतरण, धावणे, लांब उडी, उंच उडी या वैयक्तिक खेळात सुध्दा अनुक्रमे सुभाष बोड्डावार, निकिता रामटेके, सुनंदा चौधरी, प्रविण गुज्जनवार, मारोती पुनवटकर, पोर्णिमा नैताम, वैशाली कामडी इत्यादी स्पर्धकांनी उत्कृष्ट करीत पदक पटकाविले.सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने सांघिक विजतेपद पटकाविले. तसेच कला प्रकारात आॅनलाईन सातबारा या नाटकास उत्कृष्ट नाटिका तसेच प्रमोद अडबाले व मंदा हेपट यांना उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट नाटीका दिग्दर्शन व लेखनाचा पुरस्कार राजेश कावळे यांना देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भूसारी, कोरपना तहसिलदार पुष्पलता कुमरे, राजु धांडे व शरद मसराम यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धेतील यशस्वी सहभाग व नियोजनासाठी चंद्रपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, चंद्रपूरचे तहसिलदार आशिष वानखेडे, नायब तहसिलदार कांचन जगताप, शैलेंद्र धात्रक, अमोल आखाडे तसेच अजय गाडगे यांनी सहकार्य केले. स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी विजयी चमुचे कौतुक केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)