शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पाच मिनिटातच पाच ठराव मंजूर करून गुंडाळली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

मंगळवारी मनपाच्या राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आयोजित करण्यात आली होती.  यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात होताच माजी महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर मनपाला स्वच्छतेत ३ स्टार मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी  आक्षेप घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : सभागृहात कोणतीही चर्चा न करता केवळ पाच मिनिटात पाचही ठराव मंजूर करून महापौरांनी सभागृह सोडताच आमसभा गुंडाळण्यात आल्याचा अफलातून प्रकार मंगळवारी महानगरपालिकेत घडला. दरम्यान, सभेत उपस्थित झाल्याची स्वाक्षरीदेखील  न घेताच आमसभा संपविण्यात आली. हा सर्व प्रकार आर्थिक गैरव्यवहार दडपण्यासाठीच आटापिटा असल्याचा आरोप काँग्रेस विरोधी नगरसेवकांनी केला आहे. मंगळवारी मनपाच्या राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आयोजित करण्यात आली होती.  यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात होताच माजी महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर मनपाला स्वच्छतेत ३ स्टार मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी  आक्षेप घेतला. शहरात अस्वच्छता, डुकर व मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र महापौरांनी लोढिया यांच्याकडे कानाडोळा करून पटापट सर्व विषयांचे वाचन करून पाच मिनिटातच ठराव मंजूर केले. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतील  गैरव्यवहाराचे पुरावे सभागृहात सादर केले. दरम्यान, १०० कोटींच्या कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेची चर्चा टाळण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार  यांनी सभा गुंडाळून बाहेर निघून गेल्या, असा आरोप नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केला आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक देवेंद्र बेले यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

गैरव्यवहारावर बोलूच न देण्याची खेळी - विशेष म्हणजे सभागृहात उपस्थित नगरसेवकांच्या हजेरी बुकावर स्वाक्षरी झाल्या नसताना पाच मिनिटात  सत्ताधारी भाजपने सर्व  ठराव मंजूर केले. या प्रकाराने संतापलेले काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी हजेरी बुक फेकून दिले. नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद झालेली नसताना ठराव मंजूर करणे बेकायदेशीर  असल्याचा आरोप करून अन्य नगरसेवकांनीही महापौरांच्या कृतीचा निषेध केला. आजच्या प्रकरणात आयुक्त राजेश मोहिते यांची भूमिका संशयास्पद असून गैरव्यवहारावर नगरसेवकांना बोलूच न देण्यासाठी सभा गुंडाळली, असा आरोपही नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केला आहे.

रामाळा उद्यानाच्या हस्तांतरणाचा ठरावरामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसूल विभागाकडून मनपाकडे हस्तांतरीत करून शासनाने ५० कोटींचा निधी देण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. मागील सभेचे कार्यवृत्त वाचून पक्के करणे,  मुला-मुलींच्या गुणोत्तर प्रमाणाचा अहवाल सादर करण्यात आला. याशिवाय मनपा हद्दीतील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाच्या नामकरणाचाही ठराव मंजूर झाला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका