शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजपत्रित अधिकारी महासंघाचे आंदोलन

By admin | Updated: August 12, 2015 00:51 IST

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूर व संलग्न कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ..

निवेदन सादर : विविध मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्षचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूर व संलग्न कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले.राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, सरचिटणीस डॉ. अविनाश सोमनाथे, उपाध्यक्ष आर.एम.पवार, दूगार्वाहिनी अध्यक्षा डॉ.सुचिता धांडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषाध्यक्ष एम.एस.वाघमारे, कार्यकारणी सदस्य नितीन जुनोनकर, डी.एस.राऊतकर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पिंपळशेडे, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर व राजपत्रित अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी केंद्राप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे व भारतीय प्रशासनिक सेवाप्रमाणे ६० वर्ष करणे, १ जानेवारी २०१५ पासून केंद्राप्रमाणे ६ टक्के महागाई भत्ता वाढ, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील रुपये ५४०० च्या ग्रेडपेची मर्यादा काढणे, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २००६ पासून आगाऊ वेतनवाढ, मानिव निलंबन कार्यपध्दती बंद करण्यात यावी, अन्याय दूर करण्यासाठी उपलब्ध असलेली मॅट यंत्रण रद्द करु नये, सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता, केंद्राप्रमाणे वाहतुक, संघटनांना आवश्यक शासन सुविधा द्याव्यात, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणूक, कल्याण केंद्रासाठी मंजूर झालेला १० कोटीचा निधी लवकर द्यावे, चौकशी शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्याचे निलंबन होऊ नये व चक्राकार पध्दतीने पदोन्नतीने बदल्यासंदर्भात सुधारणा करण्यात यावी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)