शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पंचायत समितीचा हागणदारी मुक्तीबद्दल गौरव

By admin | Updated: May 2, 2017 01:04 IST

गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून ....

ग्रामीण स्वच्छता अभियान : सभापती व बीडीओंचा सन्मानबल्लारपूर : गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून लोकसहभागातून आठ हजारांवर नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केले. त्यामुळे बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त अभियानात विदर्भात पहिला ठरला. या कार्याबद्दल शनिवारी चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा साहित्य वितरण, हागणदारीमुक्त पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा गौरव समारंभ, दिव्यांग व सिंचन विभागाच्या वेबसाईटचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे होत्या. त्यांच्या हस्ते बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, वैशाली बुध्दलवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आ. नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रीजभूषण पाझारे, गोदावरी केंद्रे, अर्चना जीवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा विकासाभिमुख करण्याचे ध्येय असून आदर्श जिल्हा निर्मितीचा संकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल करण्याचा मानस असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. (शहर प्रतिनिधी)