शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा येथे प्रवेशद्वार सजावट स्पर्धा

By admin | Updated: October 4, 2015 01:56 IST

लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने ४ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता किसान भवन राजुरा येथे राजुरा शहरातील महिलांसाठी प्रवेशद्वार सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सखी मंचचा उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहनराजुरा : लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने ४ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता किसान भवन राजुरा येथे राजुरा शहरातील महिलांसाठी प्रवेशद्वार सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात तोरण आणि रांगोळी काढून प्रवेशद्वार सजावट करणे, तर वन मिनीट शो अशा दोन स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे बक्षिस वितरण स्पर्धेनंतर करण्यात येणार आहे.दारी तोरण आंब्यांचे घोतक आहे, मांगल्याचे रंगीत रांगोळी रेखानी जीवनी रंग भरावे, या उक्तीप्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी नृत्यांगणा अखिलेशा पाटील यांच्या नृत्यांचा धमाका आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राजुरा, सास्ती, लक्कडकोट परिसरातील सखी मंच सभासदांनी उपस्थित राहावे अशी विनंती तालुका संयोजिका जयश्री देशपांडे, शहर संयोजिका कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), सास्ती संयोजिका संध्या पत्तेवार (९६२३८२९९८६), आयोजक रिता पाटील (८०७६७९४५४) यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)मूल येथे हेअर स्टाईल व स्क्रीन केअर प्रशिक्षणमूल : लोकमत सखी मंच मूल व हनी ब्युटी पार्लर मूल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या हेअर स्टाईल प्रशिक्षण व चेहऱ्याची निगा यावर ४ आॅक्टोबर रोजी रविवारी दुपारी १ वाजता जनकल्याण शिक्षण संस्था मूलच्या कार्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात थ्री रोल पोनीटेल, पाकळी वेणी, थ्री रोल जुडा, बटर फ्लाय, ऐटरोल, झुला चोटी, फ्रीश बोन, फ्रेंच जुडा, जपानी जुडा, ऐट आकाराचा जुडा, वनसाईड सागर वेणी, गो-गो स्टाईल, सागर जुडा, वनरोल जुडा, सेवनरोल जुडा, जीलेबी जुडा व शर्मीला जुडा व सौंदर्याची निगा कशीस राखावी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात १ मिनीट शो चे आयोजन केले जाणार आहे. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश घेणाऱ्या महिलांचा ‘लक्की ड्रॉ’ समावेश करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाकरिता सखी मंच सदस्यासाठी २० रुपये व इतर महिलांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुका संयोजिका जयश्री चन्नुरवार (९४०५५०३८९९), संजिवनी वाघरे (९४२०४२३५८७) यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.