बाबूपेठ (चंद्रपूर) : शहरात रात्री गस्त घालण्यासाठी निघालेली रामनगर पोलीस ठाण्यातील सुमो उलटल्याने अपघात झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान येथील सपना टॉकीज परिसरात घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीर तर, अन्य दोघेजण किरळोक जखमी झाले. नागरिकांनी सतर्कता दाखवित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले.रामनगर पोलीस ठाण्यातील सुमो क्रमांक एमएच ३४-८४३८ ने तीन पोलीस कर्मचारी गस्तीवर निघाले दरम्यान सपना टाकीज परिसरात ते पोहचले. चालकाचे संतुलन बिघडल्याने सुमो रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळत पलटी झाली. यामध्ये एएसआय प्रभू गावळे हे जखमी झाले. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
गस्तीवरील पेट्रोलिंग वाहन उलटले
By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST