शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

गॅस गळतीने सिलिंडरचा भडका

By admin | Updated: November 1, 2014 22:49 IST

तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये एका घरी गॅसवर चहा तयार करताना अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे सिलेंडरलाच आगीने विळखा घातला. प्रसंगावधान राखून घरातील

विसापुरातील घटना : नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळलीबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये एका घरी गॅसवर चहा तयार करताना अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे सिलेंडरलाच आगीने विळखा घातला. प्रसंगावधान राखून घरातील सदस्यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना विसापूर येथे शनिवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली.बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील श्यामराव गेडाम यांच्या घरी शनिवारी सकाळच्या वेळी कुटुंबीय गॅसवर चहा करीत होते. नेमक्या याचवेळी गॅस गळती होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या लोळांनी गॅस सिलिंडरला घेरले. घरच्या मंडळीने अंगणात येऊन मदतीसाठी ओरड केली. नागरिकांनी धाव घेऊन आग लागलेल्या घराचे कवेलू काढून पहिल्यांदा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत स्वयंपाक घरातील काही साहित्य जळाले.काही वेळाने आग नियंत्रणात आणण्याच्या बंबाने आग विझविण्यासाठी धावपळ करण्यात आली. घरी असलेल्या रेतीने जळत्या सिलिंडरला काबुत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. त्यावर पाण्याचा शिडकाव करण्यात आला. बारदाणा ओला करून सिलिंडरला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानासुद्धा गॅस गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. अखेर तब्बल तासभराच्या अथक परिश्रमानंतर नागरिकांनी लोखंडी सळाखीच्या साहाय्याने पेटता गॅस सिलिंडरला बाहेर अंगणात आणून विझविला. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.या घटनेत सिलिंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनेचा पंचनामा बल्लारपूरचे तलाठी एम.बी. कन्नाके यांनी केला. यात त्यांचे पाच ते दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)