शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी विद्यार्थ्यांच्या हाती गांजा

By admin | Updated: August 30, 2014 23:33 IST

औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आता गांजाचे शहर अशी ओळख होऊ पहात आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये गांजा खुलेआम विकत मिळत असल्याने नागरिकांसह आता

कोवळे जीव नशेच्या आहारी : चौकाचौकांत मिळतो खुलेआम गांजाचंद्रपूर : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आता गांजाचे शहर अशी ओळख होऊ पहात आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये गांजा खुलेआम विकत मिळत असल्याने नागरिकांसह आता विद्यार्थीही गांजाच्या आहारी जात आहे. कोवळ्या वयात नशेची लत लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु असला तरी पोलीस ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने गांजा विक्रेत्याचे व त्याची नशा करणाऱ्यांचे फावत आहे. यामुळे शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य धोक्यात आले आहे. शहरात शिक्षणासाठी आलेल्या पाल्यांकडून त्यांच्या पालकांच्या अनेक अपेक्षा असतात. मात्र मात्र शिक्षणासाठी गेलेला आपला पाल्य गांजासारख्या व्यसनाच्या आहारी गेला असावा, याची पुसटशी कल्पनादेखील पालकांना नसते. शहरात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजसह महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हिच संधी हेरून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी कष्टात पैसा कमविण्याच्या मागे लागले आहेत. यासाठी त्यांनी गांजासारखे अंमली पदार्थ शहरात विकून माया गोळा करीत आहेत. गांजाची विक्री करणारे शहरातील काही ठराविक चौकात आपला हस्तक ठेवतात. त्याच्या माध्यमातून शौकींनाना गांजा पुरविला जात आहे. कमी श्रमात अधिक पैसे मिळविण्याच्या नादात काही विद्यार्थीही गांजा विक्रीच्या शृंखलेत अडकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गांजा ओढल्याने आपली बुद्धी तेज होते. अभ्यास चांगला होतो. रात्री अभ्यासात मन लागते, अशी थाप गांजा विक्रेत्यांकडून मारली जात आहे. त्याला विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. काही विद्यार्थी चाचणी म्हणून एखाद्या दिवशी गांजाची नशा करतात. मात्र पुढे ही नशा त्यांना हवी-हवीशी वाटत असल्याने ते नशेच्या आहारी जात आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. (नगर प्रतिनिधी)