शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर बेरोजगारांना गंडविणारी टोळी सक्रिय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या ...

जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांतच तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरीच्या आधारे तीन युवकांना नोकरीवर रुजू होण्याचे आदेशही देऊन टाकले. सोमवारी हे युवक जि. प. मध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. युवकांच्या तक्रारीवरून जि. प. प्रशासनाने बुधवारी दुपारी रामनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बॉक्स

बल्लारपुरातून हलले बनावट स्वाक्षरीसूत्र

ज्या तीन युवकांना नोकरीचे बनावट आदेश देण्यात आले. त्या प्रकरणाचे सर्व सूत्र बल्लारपुरातून हलले. यापूर्वीदेखील काही युवकांना शासकीय नोकरीच्या नावावर गंडवूनही तक्रारी झाल्या नाही. परिणामी, या टोळीची हिंमत वाढल्याची चर्चा आहे. आज जि. प. प्रशासनाने पोलिसात तक्रार केल्याने फसवणूक झालेले बेरोजगार पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोट

तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने नोकरीचा आदेश देऊन फसवणूक झाल्याची तक्रार जि.प.ला मिळाली. त्या आधारावर आज रामनगर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार केली. युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सूत्रधार कुणीतरी ब्रिजेशकुमार नावाचा व्यक्त असल्याचे समजते.

- श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.