शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या आवाहनाला गणेश मंडळांचा ठेंगा

By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST

सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा

मंगेश भांडेकर - चंद्रपूरसार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखविला आहे. शहरातील केवळ ४० मंडळानीच परवानगी घेऊन मंडप उभारले असून उर्वरित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मात्र परवानगीविनाच रस्त्यावर मंडप उभारले आहे.सार्वजनिक उत्सव, समारंभ, सभा आदी कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप उभारताना, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून खांब किंवा लाकडी बल्ल्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर खड्डे पडतात. कार्यक्रम आटोपल्यानंतर पडलेला खड्डा बुजविला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तो खड्डे वाढत जाऊन अपघात घडण्यास कारणीभूत ठरतोे. याची दखल घेत मनपा प्रशासनाने गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आवाहन करून मंडप उभारण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे सुचित केले. परवानगी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याला ठेंंगा दाखविला आहे. मनपाच्या परवानगीसाठी प्रभाग कार्यालयात अर्ज करून ५०० रूपये शुल्क मनपाच्या कर विभागात भरावे लागते. त्यानंतर मंडळाच्या सदस्यांकडून मंडप उभारताना रस्त्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही, असे हमीपत्र लिहून दिले जाते. त्यानंतर मंडळाला परवानगी दिली जाते. यात एखाद्या बादलीत रेती भरुन रस्त्यावर खड्डे न पाडता, बल्या उभे करण्याचा मनपाचा नियम आहे. मात्र, मनपाच्या या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा दाखवून रस्त्यावरच मंडप उभारले आहे. शहरातील गणेश मंडळांच्या मंडपाची पाहणी केली असता, अनेकांनी रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून बल्या उभे केले आहेत. तर मुख्य मंडपही अशाच प्रकारे उभा आहे. शहरात तीनशेच्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. मात्र, यापैकी केवळ आजपर्यंत ४० मंडळानी मनपाच्या कर विभागात ५०० रुपये शुल्क भरुन परवानगी घेतली आहे. उर्वरित मंडळाच्या सदस्यांनी मात्र, मनपाची कोणतीही परवानगी न घेता मंडप उभारले आहे. सार्वनिक कार्यक्रमाला मनपा प्रशासन कोणताही अडथळा आणणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या मंडळानी परवानगी घेतली आहे, त्या मंडळांनी मनपाच्या नियमाप्रमाणे मंडप उभारले किंवा नाही, याची चौकशी करण्याचे काम प्रभागाच्या अभियंत्याकडे आहे. दोषी आढळणाऱ्या मंडळांवर काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.