शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी मार्र्ग सर्वाधिक महाग क्षेत्र

By admin | Updated: January 5, 2015 22:59 IST

नव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना आता रेडीरेकनरच्या (बाजार मूल्य) दर वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला रेडीरेकनरच्या दरात १० ते १२

रेडीरेकनरच्या दरवाढीचा फटकामंगेश भांडेकर -चंद्रपूरनव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना आता रेडीरेकनरच्या (बाजार मूल्य) दर वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला रेडीरेकनरच्या दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे दरवाढीचा अडथळा दूर करूनच घर, प्लॉट, जमीन खरेदी करावी लागणार आहे. चंद्रपूर शहरात सर्वाधिक महागाई असलेला भाग महात्मा गांधी मार्ग असून सर्वात स्वस्त भाग कॉलरी क्षेत्र आहे. राज्य शासन दरवर्षी १ जानेवारीला रेडीरेकनरचे दर जाहीर करत असते. यावर्षी दर जाहीर करण्यात आले असून हे दर सर्वत्र लागू करण्यात आले आहे. शहरातील काही भागात नव्या दरानुसार १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे घर, जमीन, दुकान खरेदी मुद्रांकाचा खर्च खरेदीदारांनाच करावा लागणार असल्याने दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. खुली जमीन, निवासी इमारत, वरचा मजला, तळ मजला, व्यावसायिक दुकान चाळीचे दर वाढले असल्याने ग्राहकांचीच चांगलीच कसरत होणार आहे. नव्या दरानुसार जिल्हा निबंधक कार्यालयात दर आकारले जात आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे कोरडा दुष्काळाची स्थिती राज्यात निर्माण झाली. त्यामुळे महागाई थोडी कमी होईल, असे अनेकांना वाटत होते. नव्या वर्षात घर घेण्याचे अनेकांनी नियोजन केले. मात्र दर वाढल्याने घर चांगलीच कसरत होणार आहे. प्लॉटिंग व्यावसायिकांची चांदीप्लॉटिंगच्या व्यवसायातून रातोरात लखपती होण्याची किमया अनेकांनी साधली आहे. प्लॉट, घर खरेदी-विक्री करताना अनामत रक्कम देवून नोंदणीकृत खरेदीखत केले जाते. या खरेदीच्या आधारे आणखी तीन व्यवहार ग्राह्य मानले जातात. ही बाब लक्षात घेता, प्लॉटींग व्यावसायिक एखाद्याच्या मालमत्तेचे खरेदीखत करून त्या मुदतीत गरजू ग्राहक शोधतात. खरेदी केलेल्या दरापेक्षा एक ते दीडपट अधिक नफा कमावत सदर मालमत्तेचे हस्तांतरण केले जाते. खरेदी-विक्रीत कोणतीही गुंतवणूक न करता विकणारा व विकत घेणाऱ्या व्यक्तीशी समन्वय साधून कमीशन तसेच दरातील तफावतीची रक्कम लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीतून कोणाला नफा होवो अथवा न होवो प्लॉटींग व्यावसायिकांची चांदी होते. प्लॉटींगच्या व्यवसायातील नफा लक्षात घेता अनेकांनी हा व्यवसाय जोडधंदा म्हणून सुरु केला आहे. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक व्यवहारनव वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनरचे दर वाढणार आहे, अशी ज्यांना माहिती होती. त्यांनी डिसेंबर महिन्यातच व्यवहार उरकून घेतले. त्यामुळे वर्षभराच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात जिल्ह्याभरात २ हजार २२९ खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. यात सर्वाधिक ६२९ व्यवहार चंद्रपूर तालुक्यात झाले. डिसेंबर २०१३ मध्ये २ हजार १४५ व्यवहार झाले होते. दरवर्षी हिच स्थिती दिसून येत असल्याचे जिल्हा निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.