शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारासह कार्यकर्ते घालणार १० रुपयांची गांधी टोपी

By admin | Updated: February 3, 2017 01:04 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उभा राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात

कार्यकर्त्याचा चहा ६ रू. तर जेवण ७५ रुपये : प्रशासनातर्फे तब्बल १०५ वस्तूंचे दर निश्चितराजकुमार चुनारकर  चिमूरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उभा राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आहे. त्यानुसार प्रशासनाने खर्चाचे दर निश्चित केले असून चहासाठी ६ रुपये, पुरी-भाजी, भजे, चिवडा (स्नॅक)च्या प्लेटसाठी २० रुपये तर कार्यकर्त्याच्या जेवणावळीमध्ये शाकाहारी जेवणासाठी ७५ रुपये आणि मासांहारी जेवनासाठी २०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनातर्फे तब्बल १०५ वस्तूंच्या दराची सूची तयार करण्यात आली असून ती सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.उमेदवाराकडून प्रचार काळात कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. त्यामध्ये उमेदवारांचा चहा, पान तसेच भोजन व्यवस्थेसाठी सुमारे पाच प्रकारच्या वस्तू आयोगाने निश्चित केल्या आहेत. त्यात पुरीभाजी, चिवडा, भजे, पोहे (स्नॅक) २० रुपयांना असून चहा ६, तर कॉफीचा दर १० रुपये असणार आहे. शाकाहारी जेवन ७५ रुपये व मासाहारी जेवन २०० रुपयांप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे.प्रशासनाकडून खुल्या बाजारातून मागविण्यात आलेल्या दरानुसार निवडणुकीत लागणाऱ्या वस्तूंचे दर ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फर्निचर आणि मंडप व्यवस्थेच्या ३७ वस्तू चहा-पान भोजनाच्या ५ वस्तू होर्डीग, बॅनर, झेंडा, टोपीचे १२ प्रकार शासनमान्य जाहिरातीचे दर, टी.व्ही. चॅनलवरील जाहिरातीचे दर तसेच झेरॉक्सच्या दरांचा समावेश आहे. तसेच साधी प्लास्टिक खुर्चीचे दर वगळता इतर जवळपास सर्वच दर १०० रुपयाच्या पुढे ठरविण्यात आले आहेत. प्रचारात वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये चारचाकी, तीनचाकी, आणि रिक्षा यांचेही दर ठरविण्यात आले आहेत. गांधी टोपीचा दर १० रुपये आहे. त्यामुळे उमेदवारासह कार्यकर्ते आता १० रुपयाची गांधी टोपी वापरणार आहेत.उमेदवारासाठीचे काही प्रमुख खर्चाचे दरचहा ६ रुपये, कॉफी १० रुपये, नास्ता, भजे-चिवडा,स्नॅक २० रुपये, शाकाहारी जेवन ७५ रुपये, मासाहारी जेवन २०० रू.(प्रति), बिसलरी बाटल २० रुपये, पाणी कॅन ४० रुपये, गांधी टोपी १० रुपये, दुपट्टा ५० रुपये, कमांडर, जीप, सुमो १ हजार रुपये, प्रति दिवस टाटा मॅजिक ८०० रुपये, तीन चाकी आॅटोरिक्षा ५०० रुपये, प्लास्टिक खुर्ची ५ रुपये, लाऊड स्पीकर १२०० रुपये प्रतिदिन, व्हिडिओग्राफी प्रतिदिन २ हजार रुपये.