शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नफेखोरीतून जनतेच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:38 IST

अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खाद्य पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही पदार्थांची विक्री सुरु आहे.

ठळक मुद्देअनेकांकडे परवाना नसतानाही पदार्थांची विक्री सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूूर : अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खाद्य पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही पदार्थांची विक्री सुरु आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करित असून केवळ नोटीस पाठविण्याचे काम सुरु आहे.अन्न सुरक्षा व मानक कायद्यानुसार अन्न पदार्थ विक्रेत्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकांकडे नोंदणी प्रमाणपत्र किंवा अन्न परवाना असणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशनकडून अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. नफेखोरीतून विक्रेते अनोंदणीकृत गोळ्या, औषधे व पदार्थांची सर्रास विक्री करीत आहेत.५ जानेवारी २०११ पासून अन्न सुुरक्षा व मानदे कायदा लागू करण्यात आला. पदार्थ उत्पादन करणाºया संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना बंधनकारक आहे. या कायद्या अंतर्गत पदार्थांची विक्री अन्न परवानाधारक संस्थामार्फत होणे आवश्यक आहे.मात्र, अनेकांकडे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे पदार्थांत भेसळीचे प्रकार घडत आहेत.अन्न सुरक्षा कायद्यानुसार औषध व पदार्थ विक्रीचे निकष ठरवून देण्यात आले आहे. हॉटेलमधील ग्राहकांसाठी व्यवस्था, पदार्थ तयार करण्याचे निकष आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अशी व्यवस्था दिसून येत नाही. अस्वच्छता अनेक हॉटेलात दिसून येते. चंद्रपूर शहरात जवळपास एक हजार तर प्रत्येक तालुक्यात सातशे ते आठशेच्या जवळपास किराणा दुकान आहेत. शहरातील किराणा दुकानांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भेट देऊन वर्षातून एकदा तरी पाहणी करतात. मात्र, ग्रामीण भागात हे अधिकारी कोणत्याही दुकानाला भेट देताना दिसत नाही. त्यामुळे या दुकानांवरुन अनोंदणीकृत चॉकलेट, गोळ्या विक्री केली जात आहे. लहान मुलांना फारसी समज नसल्याने खाऊ म्हणून या गोळ्या सेवन करतात. मात्र, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच पदार्थांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे. शहरातील पदार्थ विक्रीच्या दुकानाची तपासणी नियमित होत नाही. तर ग्रामीण भाग व मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल, धाब्यांची तपासणी होत नाही. झालीच तर आधीच पदार्थ उत्पादकांना माहिती मिळत असते. त्यामुळे अधिकारी पोहल्यावर सर्व ‘आॅल इज वेल’ आढळून येते. त्यामुळे अधिकाºयांची कोणतीही भिती न बाळगता धाबे चालक अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लघंन करीत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गुटखा बंदी नावापुरतीशासनाने मावाजन्य व गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, बंदीची अंमलबजावणी करणारे अधिकारीच कारवाई करण्यास निरुत्साही दिसून येत आहेत. शहरात खुलेआम मावाजन्य पदार्थाची विक्री होत आहे. हे नागरिकांना दिसत असले तरी अधिकाºयांना दिसत नसावे तर नवलच. कारवाई करण्याचा अधिकार असूनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी थेट जाऊन कारवाई करु शकत नाही. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करता येऊ शकते. परंतु, तसे पाऊल उचलले जाणे गरजेचे आहे.