शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान नसलेले शहर गडचांदूर, भुखंड पडलेले ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST

कोरपना : उद्योगाची ओळख असलेल्या गडचांदूर शहरात एकही उद्यान नाही. उद्यानापासून वंचित शहर म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील इतर ...

कोरपना : उद्योगाची ओळख असलेल्या गडचांदूर शहरात एकही उद्यान नाही. उद्यानापासून वंचित शहर म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत विचार केल्यास गडचांदूर मागासलेलाच असल्याचे चित्र आहे. कोरपना तालुक्‍याच्या मध्यभागी असल्याने व सिमेंट कंपन्यांचे जाळे असल्यामुळे गडचांदूर शहराला महत्त्व प्राप्त झाले. शहराची लोकसंख्या वेगाने वाढली. गडचांदूर गावाचे शहरात रूपांतर होऊन जवळपास सात वर्षे पूर्ण झाली आहे. नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर शहर वेगाने विकसित होईल, अशी लोकांची आशा होती. मात्र सिमेंट काँक्रिटीकरण वगळता काहीही नावीन्यपूर्ण कामे शहरात झालेली दिसून येत नाहीत.

बालकांना, महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा करण्याकरिता शहरात २० ते २५ खुले भूखंड उपलब्ध असताना, कुठेही उद्यान निर्माण करण्यात आले नाही. शहरवासीयांना केवळ प्रदूषणयुक्त वातावरणात आपला वेळ काढावा लागतो. अनेक शहरांमध्ये नावीन्यपूर्ण कामे करण्यात आली असून, उद्यानेसुद्धा विकसित करण्यात आली आहे.