शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून झाले अनाथ तरूणावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 26, 2015 01:11 IST

बालपणी वडिलाचे छत्र हरपले, आई वेडी झाली. मोठी बहीण भावंडाचा सांभाळ मोलमजुरीची कामे करून कुुटुंबाचा गाडा हाकत असताना एका अपंग भावाची काळजी धाकटी बहीण घेत होती.

विसापूरकरांची सामाजिक बांधिलकी : अनेकांनी दिला मदतीचा हातअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबालपणी वडिलाचे छत्र हरपले, आई वेडी झाली. मोठी बहीण भावंडाचा सांभाळ मोलमजुरीची कामे करून कुुटुंबाचा गाडा हाकत असताना एका अपंग भावाची काळजी धाकटी बहीण घेत होती. घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची, अपंग असलेल्या भावाचे रविवारी अकाली निधन झाले. अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडण्यासाठी अडचण निर्माण झाली. अशातच विसापूरकरांची सामाजिक बांधीलकी कामी आली. अनेकांनी मदतीचा हात पुढे करून अनाथ तरुणावर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार केले. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विवेक पांडुरंग पुणेकर (३०) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या अंत्यसंस्काराला सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या रूपाने आपुलकीची झालर मिळाली. विसापुरात एकेकाळी पांडुरंग पुणेकर यांच्याकडे किराणा दुकान होते. पत्नी सरीता त्यांच्या व्यवसायात हातभार लावत होती. सुखी व संपन्न कुुटुंबाचा वारसा त्यांना लाभला होता. मात्र नियतीचे चक्र उलटे फिरले. पत्नी सरिताला वेडेपणाच्या आजाराने ग्रासले, त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू झाली. यातून त्यांना सावरता आलेच नाही. पत्नीच्या आजारपणाचा खर्च वाढला. दारिद्र्याने त्याचा पाठलाग केला. अखेर संसाराचा गाडा पुढे नेताना दारिद्र्यातच पांडुरंगचा मृत्यु झाला. अशातच कुटुंबाचा भार मुलगी रंजनावर आला. हलाकीच्या परिस्थितीतही त्या कुटुंबाचा जीवन प्रवास सुरू होता. तीन भाऊ व एक बहिण आणि वेडी आई अशा कुटुंबाला दारिद्र्याच्या चक्रव्यूहाने ग्रासले होते. मात्र रंजना कुटुंबासाठी प्रामाणिकपणे मार्गक्रमण करीत होती. एका भावाचे मध्यंतरी निधन झाले आणि रविवारी त्यातील विवेकचा जीवन प्रवास थांबला.विवेकच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतीचे लिपीक राजू पुणेकर, किरणकुमार पुणेकर, सुमेध शेंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी लोक वर्गणीचा मार्ग निवडला. अनेकांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक कर्तव्याचा परिचय दिला. पाहता पाहता मायेची ऊब जागृत झाली. अंत्यसंस्काराला लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमव करून आईवडीलाविना पोरका असलेल्या विवेक नावाच्या तरुणावर विसापूर येथील स्मशानभूमीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गरीब, अनाथ व कमकुवत घटकातील व्यक्तींना येथील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा मदतीचा हात दिला, त्याची पुर्नरावृत्ती आजही दिसून आली.