शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

शेतकऱ्याने केला कापसावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:21 IST

तालुक्यातील सोनुर्ली गावात शेतकºयाने चक्क कापसाची अंत्ययात्रा काढून कापसाला स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केला. शासनाकडून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने चार क्विंटल कापूस स्मशानभूमीत नेऊन पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : चार क्विंटल कापसाला दिला स्मशानभूमीत अग्नी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील सोनुर्ली गावात शेतकºयाने चक्क कापसाची अंत्ययात्रा काढून कापसाला स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केला. शासनाकडून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने चार क्विंटल कापूस स्मशानभूमीत नेऊन पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.ईश्वर पडवेकर असे शेतकऱ्याचे नाव असून कापसाला हमीभाव न मिळाल्याने शासन व जिनिंग मालकाच्या कारभाराला कंटाळून ईश्वर पडवेकर यांनी स्वत:च्या कापसावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला. असा प्रकार करून या शेतकऱ्याने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून शासनाविरुद्ध शेतकऱ्यांच्या मनात असलेला रोष या माध्यमातून आणखी दिसून आला आहे. ही घटना कोरपना पोलिसांना माहित होताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची अतिशय दैनावस्था झाली आहे. फसवी कर्जमाफी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर बोंड अळी व नापिकीमुळे शेतकरी कंटाळला असताना शेतकºयांच्या पिकाला भाव नाही. कापसाचे पीक सरासरीपेक्षा निम्म्यावर आले आहे. ईश्वर पडवेकर या शेतकºयाने स्मशानभूमीत कापसाची अंत्ययात्रा काढून देशातील शेतकºयांचा प्रातिनिधिक रोष व्यक्त केला आहे.- अरुण निमजे, माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद, चंद्रपूर.