शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:12 IST

राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० ...

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती : दीक्षाभूमीला नवे स्वरूप येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्र्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय २७ सप्टेंबर रोजी जारी केला आहे.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे १६ आॅक्टोबर २०१६ रोजी निधी देण्याचे जाहीर केले होते. १९५६ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना बौध्द धर्माची दीक्षा दिल होती. या दिवसाची साक्ष म्हणून प्रत्येक वर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे १५ व १६ आॅक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा केला जातो.१६ आॅक्टोबर २०१६ रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्दधर्मीय नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार यासाठी २ कोटी रूपयांच्या मर्यादेत तत्वत: मान्यता २४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.आयुक्त समाजकल्याण पुणे यांचे मार्फत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरणाच्या सादर केलेल्या १ कोटी ९८ लाख १५ हजार ३०० इतक्या रकमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात सुध्दा ना. मुनगंटीवार यांनी निधी उपलबध करण्याची घोषण केली होती. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व परिसर सुशोभीकरणाच्या माध्यमातून महामानवाला मोठी आदरांजली ठरणार आहे.या निधीमुळे दीक्षाभूमीला वेगळे रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे बौद्धबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.