शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांसाठी जिल्हा परिषदेला २३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:01 IST

डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती-नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी  राबविली जाते. शासनाच्या या अनुदान योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी २. ५० लाख, जुनी विहीर दुरूस्ती ५० हजार, इनवेल बोअरींग २० हजार, पंप संच २० हजार, वीज जोडणीसाठी १०  हजार, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण एक लाख व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच ५० हजार किंवा तुषार सिंचन संच २५ हजार), पीव्हीसी पाईप ३० हजार, परसबाग ५०० अनुदान दिल्या जाते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : रखडलेल्या योजना सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रातंर्गत व क्षेत्राबाहेरील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या दोन योजनांमुळे आत्मसन्मानाने जगण्याचे मार्ग सापडतात. मात्र, कोरोनामुळे सरकारने ३३ टक्केच निधी दिला होता. या धोरणात बदल केल्याने जिल्हा परिषदला सुमारे २३ कोटींचा निधी नुकताच प्राप्त झाला. या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती-नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी  राबविली जाते. शासनाच्या या अनुदान योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी २. ५० लाख, जुनी विहीर दुरूस्ती ५० हजार, इनवेल बोअरींग २० हजार, पंप संच २० हजार, वीज जोडणीसाठी १०  हजार, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण एक लाख व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच ५० हजार किंवा तुषार सिंचन संच २५ हजार), पीव्हीसी पाईप ३० हजार, परसबाग ५०० अनुदान दिल्या जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती (क्षेत्रातंर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेसाठी अनुसूचित जमातीचे शेतकरी पात्र ठरतात. त्याकरिता लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या मर्यादेत असावी. लाभार्थ्यांची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे बंधनकारक आहे. या दोन्ही योजनांसाठी राज्य शासनाने यापूर्वी केवळ ३३ टक्के निधी दिला होता. त्यामुळे अनुुदान योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया रखडली होती. १२  फेब्रुवारी २०२१ रोजी जुन्या निर्णयात बदल करून १०० टक्के निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शिवाय, तातडीने निधी मंजूर केला. नवीन आदेशानुसार, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी क्षेत्र अंतर्गत ५ कोटी ५० हजार, क्षेत्राबाहेर २ कोटी ९६ लाख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला आहे.

१० हजारपेक्षा जास्त अर्जदार शेतकरीबिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी सुमारे १० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर केल्याचा अंदाज आहे. उपलब्ध निधीनुसार शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती