शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:03 IST

चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, ....

ठळक मुद्देप्राचीन ठेवा चकाकणार : हंसराज अहीर यांना केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील नादुरुस्त व भग्नावस्थेतील वास्तुंचे पुनर्बांधकाम करण्यात यावे व यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली असता केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी सर्व मागण्यांकडे विशेष लक्ष देत निधीची तरतूद केली जाईल, असे चर्चेदरम्यान आश्वासन दिले.ना. हंसराज अहीर यांच्या नवी दिल्ली स्थित शासकीय निवासस्थानावर २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेदरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना श्यामकुळे, वणी क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा नेते विजय राऊत, इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, रवींद्र गुरनुले, ऐतिहासिक वास्तुंचे अभ्यासक टी.टी. जुलमे आदींची यावेळी उपस्थिती होती.केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे व परकोटांविषयक वारसा दर्शविणारी पुस्तिका यावेळी सादर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील, संशोधन व संवर्धनाकरिता कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात व लोकसभा क्षेत्रामध्ये दुर्लक्षित असलेल्या वास्तुंसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ना.अहीर यांनी केली. पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यास भेट देऊन या ऐतिहासिक, पुरातन वास्तुंचा परामर्ष घ्यावा, अशी विनंती सुद्धा ना. अहीर यांनी केली. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन विषयक सर्व बाबी व सूचनांची योग्य दखल घेऊन येथील ऐतिहासिक वारशांचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने इको-प्रोद्वारा चंद्रपूर महानगरातील ऐतिहासिक परकोटांची व त्या परिसराची स्वच्छता करण्याचे अभियान तब्बल २०० दिवस राबविण्यात आले. या उपक्रमांची प्रशंसा केली.