शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: September 4, 2015 00:57 IST

ग्रामीण भागातील राजकारणाला दिशा देणारी व ग्राम विकासाला चालना देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका महिन्यापूर्वी घेण्यात आल्या.

बल्लारपूर : ग्रामीण भागातील राजकारणाला दिशा देणारी व ग्राम विकासाला चालना देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका महिन्यापूर्वी घेण्यात आल्या. बल्लारपूर तालुक्यात १७ पैकी १० ग्रामपंचायतीत नवीन सदस्य निवडून आले. हा सर्वात मोठा टप्पा आहे. यामुळे ग्रामीण भागातले राजकारण ढवळून निघाले. तहसील प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आता ग्रामीण भागातील राजकारणाने वेग घेतला असून सरपंच व उपसरपंच पदावर आपल्याच पक्षाचे उमेदवार बसावे म्हणून गावपातळीवरील राजकारण्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, मानोरा, पळसगाव, आमडी, कळमना, गिलबिली व किन्ही येथील ग्रामपंचायतीची मुदत ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान संपत आहे. यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत नवीन सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने तहसील प्रशासनाने २६ मार्च रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी जातीनिहाय आरक्षण सोडत काढली होती. याच आरक्षण धोरणानुसार सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. गाव पातळीवर सरपंचपदाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.नांदगाव (पोडे), कोर्टिमक्ता व मानोरा येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ७ सप्टेंबरला घेण्यात येत आहे. हडस्ती ग्रामपंचायतीत ८ सप्टेंबर, पळसगाव व आमडी येथे ११ सप्टेंबर, विसापूर १४, कळमना व गिलबिली येथे १५ तर किन्ही ग्रामपंचायतीमध्ये १७ सप्टेंबरला सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे. नांदगाव (पोडे) व पळसगाव येथे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. विसापूर येथे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. हडस्ती व गिलबिली येथे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.किन्ही व कळमना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. आमडी व मानोरा येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. कोर्टिमक्ता येथे सर्वसाधारण महिला सरपंचपद राखीव आहे. यामुळे गावपातळीवरील राजकारणी आपल्या गटातील सदस्याला सरपंचपदाची खुर्ची मिळावी म्हणून मोर्चे बांधणीच्या कामाला सुरूवात केली आहे. यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची मनधरणी करण्याचे धोरण अवलंबविण्यात आले आहे.तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आले आहे. यामुळे गावगाड्यातील राजकारणाने वेग घेतला आहे. काही ठिकाणी सदस्यांनी आपल्या बाजुने मतदान करावे, म्हणून सदस्यांची अज्ञातस्थळी रवानगी केली आहे. काहींना धार्मिकस्थळाची मेजवानी मिळत आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत केंद्रस्थानी असल्यामुळे व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यापेक्षा सरपंच पदाला झुकते माप मिळत असल्याने सरपंचपदाची निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. या दृष्टीकोनातून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासाठी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विसापूर येथे १७, नांदगाव (पोडे) येथे ११, पळसगाव येथे ९, कळमना येथे ९, मानोरा येथे ९, गिलबिली येथे ९, हडस्ती येथे ७, आमडी येथे ७, कोर्टिमक्ता येथे ७ व किन्ही ग्रामपंचायतमध्ये ७ असे एकूण १० ग्रामपंचायतीत नवीन ९२ सदस्य निवडून आले. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत यातील १० जणांना सरपंच व १० जणांना उपसरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.