शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: January 26, 2017 01:26 IST

गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल

एकास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी मूल : गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल व सावली तालुका श्रमिक एल्गारच्या वतीने मूल उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील हजारो महिला-पुरूष सहभागी झाले होते. सरकारचे धोरण गरीब विरोधी असून त्याविरोधात श्रमिक एल्गारचा लढा सतत सुरू राहील, असा निर्धार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केला. त्या मोर्चाला संबोधीत करताना बोलत होत्या. जिल्ह्यातील अनेक एपीएल कुटूंबात कुपोषीत मुले असल्याने कुपोषण मुक्तीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजे, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने मूलचे तहसिलदार सरवदे व सावलीचे तहसिलदार भोयर यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, अनिल मडावी, संगीता गेडाम, रवी शेरकी, रामचंद्र हुलके, यात्रीका कुमरे, मिराबाई पेटकुले यांची भाषणे झालीत. सभेचे संचालन मूल तालुका सचिव दिनेश घाटे यांनी तर आभार किरण शेंडे यांनी मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी फरजाना शेख, सपना कामडी, वंदना मांदाडे, अनिल शेंडे, अमित राऊत, प्रेमदास उईके, बाळू मडावी, अरूण जराते, वच्छलाबाई लटारे, दौलत शेंडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) या आहेत मागण्या एपीएल कार्डधारकांना रेशन मिळाले पाहिजे, धान्यात वाढ झाली पाहीजे, कुपोषण मुक्तीसाठी प्रत्येक कुटूंबाला धान्य द्यावे, प्रत्येक कुटूंबाला किमान दोन लिटर रॉकेल द्यावे, वनजमिनीसाठी गैरआदिवासी करीता लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करावी, पट्टे देण्यासाठी ग्रामसभेची पन्नास टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.