शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड ग्रामपंचायतीवर मोर्चा

By admin | Updated: March 2, 2016 00:33 IST

नागभीड ग्रामपंचायती अंतर्गत विविध मागण्यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांच्या नेतृत्वात सोमवारी येथील ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्या : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिले निवेदननागभीड : नागभीड ग्रामपंचायती अंतर्गत विविध मागण्यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांच्या नेतृत्वात सोमवारी येथील ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. या मोर्चात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यात यावी, अस्वच्छता पसरविणारे खताचे खड्डे तातडीने हटविण्यात यावे, वॉर्ड क्रमांक पाचमधील पुलाचे काम करण्यात यावे, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात यावे, १४ व्या वित्त आयोगातील कामाची त्वरित पूर्तता करण्यात यावी, रहिवासी दाखला नि:शुल्क देण्यात यावा, क्रीडांगणावर विद्युत दिव्यांची सोय करण्यात यावी आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. ग्रामपंचायतीवर मोर्चा गेल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांनी सरपंच विनय शेंडे आणि ग्रामविकास अधिकारी एस.एन नगराळे यांच्यापुढे मागण्या मांडल्या. मागण्यांचा विचार करून त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संजय अमृतकर, आरिफ मिर्झा, मनीषा निहाटे, कमल ठोंबरे राकेश वाढई यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)