शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त गावकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:43 IST

तालुक्यातील शिरसी येथे ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी खुशी हजारे या चार वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरातून नेले. या घटनेला तब्बल एक महिना लोटला.

ठळक मुद्देबंदोबस्त करा : बिबट्याच्या दहशतीत वावरताहेत ग्रामस्थ

आॅनलाईन लोकमतसावली : तालुक्यातील शिरसी येथे ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी खुशी हजारे या चार वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरातून नेले. या घटनेला तब्बल एक महिना लोटला. तरीही त्या गाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सावली येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.सदर घटनेच्या आधीपासूनच बिबट्याने गावातील कोंबड्या, बकऱ्यांना मारून दहशत माजविली होती. त्यातच खुशीचे प्रकरण घडले. एक महिना लोटूनही वनविभागाकडून कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे शिरसी येथील संतप्त नागरिक येथील वनविभागाच्या कार्यालयावर धडकले. नगरपंचायतच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यात नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा. गावाच्या सभोवताल पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे. पीडित कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन वनविभागाला देण्यात आले. दरम्यान, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.व्ही. धाडे यांनी ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठांना बोलविल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने उपविभागीय वनसंरक्षक राजन तलमले यांना तिथे हजर व्हावे लागले. त्यांनी ग्रामस्थांचे समाधान करीत शुक्रवारी पिंजरा लावण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले.