शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मोर्चा

By admin | Updated: August 21, 2014 23:46 IST

शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली,

ब्रह्मपुरी : शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुके वगळण्यात आले आहे. शासनाने पुन्हा विचार करुन तिन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीसाठी गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने हजारो शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या सहभागात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने बहुतांश भागातील रोवणीची कामे खोळंबली आहेत. मात्र शासनाने चुकीचा निष्कर्ष लावून हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले. यामुळे ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांवरील अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी १९ आॅगस्टला तिन्ही तालुक्यातील जवळपास १०० ते १५० शेतकरी बांधवांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपल्या भागाची व्यथा मांडली. परंतु अजूनही शासनाने ठोस भूमिका न उचलल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, विजेचे भारनियमन रद्द करा, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, एपीएल, बीपीएलधारकांना सणाकरिता साखर उपलब्ध करून द्या, संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान द्या, अतिक्रमणधारकांना वन जमिनीचे पट्टे द्या, मनरेगाअंतर्गत झालेल्या कामांचे मजुरांना त्वरीत वेतन द्या, अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चात आमदार अतुल देशकर, दीपक उराडे, वंदना शेंडे, नामदेव लांजेवार, क्रिष्णा सहारे, नानाजी तुपट रामलाल दोनाडकर, वसंत वारजुकर, रिता उराडे, योगेश राऊत यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर मोर्चात सहभाग होते. (प्रतिनिधी)