शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बल्लारपूर पेपरमिल कामगारांचा व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा

By admin | Updated: February 1, 2017 00:30 IST

पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बल्लारपूर पेपरमिल कामगारांनी आज मंगळवारी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला.

बल्लारपूर : पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बल्लारपूर पेपरमिल कामगारांनी आज मंगळवारी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला.बल्लारपूर शहराची जीवनदायिनी असलेली बल्लारपूर पेपरमिल कंपनी मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात आहे. येथील परमंन्ट, डेलिपेड व रोजंदारी कामगारांचे वेतन गेल्या पाच महिन्यापासून थकीत आहे. त्यामुळे कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी येथील बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्त्व राजू झोडे, अ‍ॅड. शैलेश मुंजे, प्रशांत बहिरम व संजय लुटे यांनी केले. हा मोर्चा स्थानिक कादरीया मस्जीद ते कलामंदिर, तीन एक्का गेट, जयभीम चौक, दत्त मंंदिर, जुना बस स्टॅन्ड या मार्गाने जात नगर परिषद येथे विसर्जित करण्यात आले. याप्रसंगी राजु झोडे आणि अ‍ॅड. शैलेश मुंजे यांनी बिल्ट व्यवस्थापनाला त्वरित सर्व कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन देण्यात यावे. अन्यथा हे आंदोलन अधिकच तिव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. याप्रसंगी प्रशांत बहिरम, संजय लुटे व उमेश कडू यांचेही भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)आज बल्लारपूर बंदबल्लारपूर पेपरमिलमधील कामगाराच्या थकीत असलेल्या वेतनाविरुद्ध बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघातर्फे आज बल्लारपूर बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदला स्थानिक बल्लारपूर बिझनेस असोसिएशन, आॅटो असोसिएशन, पानठेला असोसिएशन या संघटनेने समर्थन दिले आहे. या बंदला शहरातील सर्व शाळा व कॉलेज बंद करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.