शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी येथे ३० रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया

By admin | Updated: October 25, 2015 00:56 IST

इंटरनॅशनल सोसायटी आॅफ कोलोप्रोक्टोलॉजी अंतर्गत नागपूर सर्जन्स अशोशिएशन, विदर्भ सर्जन असोशिएशन, ब्रह्मपुरी मेडीकल असोशिएशन ...

नॅशनल कोलोरेक्टर सर्जिकल वर्कशॉप : विविध संघटनांचा पुढाकार, नामांकित डॉक्टरांचा सहभागब्रह्मपुरी : इंटरनॅशनल सोसायटी आॅफ कोलोप्रोक्टोलॉजी अंतर्गत नागपूर सर्जन्स अशोशिएशन, विदर्भ सर्जन असोशिएशन, ब्रह्मपुरी मेडीकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्थानिक लाडूकर सर्जिकल हॉस्पिटलमध्ये ३० रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली.तीन दिवसीय नॅशनल कोलोरेक्टर सर्जिकल वर्कशॉपमध्ये भारतातील ५० सर्जन सहभागी झाले होता. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्जन्सनी कोलोप्रोक्ट्रॉलॉजी (मोठे आतडे व गुदद्वाराशी संबंधित) पाईल्स, फीशर आदी सर्जरीचे अध्ययन व वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेतला. या शिबिरात एकाचवेळी ३० शस्त्रक्रीया होण्याचे हे जवळपास एकमेव आयोजन होते. युनायटेड सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद येथून कोलोनोस्कोपीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी दत्ता मेघे युनिव्हसिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. दिलीप गोडे तर प्रमुख अतिथी डॉ. बी.एस. गेडाम लता मंगेशकर हॉस्पिटलीटल नागपूर, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. सतीश देशमुख, ब्रह्मपुरीचे प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया, नगराध्यक्षा रिता उराडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराचे औचित्य साधून मदुराई (तामीळनाडू) येथील वयोवृद्ध सर्जन डॉ. पी. शिवलिंगम यांचा या कार्यशाळेत सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेला डॉ. शांतीकुमार चिवटे, डॉ. वसंत पिलारे, डॉ. पालीवाल, डॉ. राजश्री भांडारकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात सर्व सर्जन्सची परीक्षा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या सर्जन्सना २०१६ मध्ये जयपूर येथे होणाऱ्या वर्ल्डकॉर्नमध्ये फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कीर्ती लाडूकर, प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा लाडूकर, डॉ. प्रशांत राहाटे, हृषीकेश गोखरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अभिषेक आणि कार्तिक दहीकर प्रस्तुत संगीत रजनीने करण्यात आली. (प्रतिनिधी)