शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST

पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचे फलित : विकासाला चालना व रोजगाराची संधी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्नांमुळेच एमआयडीसी निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) खासगी १०२.५० हे. आर क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये जमिनीचे नुकसान भरपाईचे दर निश्चितीबाबत प्रस्ताव उच्चाधिकार समितीपुढे सादर करण्यात आला होता. १९ आॅक्टोबर २०१८ रोजी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अनुषंगाने ११ जून २०१९ रोजी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे कक्ष अधिकारी नंदु निस्तरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर क्षेत्राच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रासाठी १८७. ६७ हे.आर. क्षेत्र अधिसूचित करण्यात आले होते. पैकी कोसंबी (रिठ) येथील १०२.५० हे.आर. क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली. त्यापैकी ५४.५२ हे.आर क्षेत्रातील ४९ खातेदारांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. शासनाची मान्यता मिळाल्याने आता एमआयडीसी स्थापनेच्या प्रक्रियेला गती येणार आहे.दिव्यांगांना आज स्वयंचलित सायकल वितरणजि.प. समाजकल्याण विभागाच्या वतीने बुधवारी जि. प. सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना बॅटरीवर चालणाºया स्वयंचलित तीन चाकी सायकलच्या वितरणाचा पहिला कार्यक्रम मूल येथे शनिवार पार पडला होता. दिव्यांग व्यक्ती व कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो. साधी तीनचाकी सायकल चालवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अशा सर्व दिव्यांगांना स्वयंचलित सायकल वाटपाचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.स्वंयरोजगाराकडे तालुक्याची वाटचालपोंभुर्णा पोल्ट्री कंपनी ही आदिवासी महिलांची महाराष्ट्रातील पहिली कुक्कुटपालन व्यवसाय करणारी संस्था पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे स्थापन झाली आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसाय प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प, बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट, मधुमक्षिका पालना, कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत आयटीसी कंपनी, बांबू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अगरबत्ती उत्पादन प्रकल्प या प्रकल्पांमुळे या तालुक्याची वाटचाल रोजगार व स्वयंरोजगाराकडे आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार