शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:05 IST

नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे.

ठळक मुद्देदहा तालुक्यांचा समावेश : रा. प. महामंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना सत्र २०१८- १९ साठी मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ नोव्हेेंबर रोजी प्रारित केले आहे.दरवर्षीच असमानी व सुलतानी संकटाना शेतकºयांना पुढे जावे लागते. त्यामुळे शासनाने यावर्षी महा मदत प्रणालीतर्फे दुष्काळासाठी मुल्यांकन केले. त्यानुसार ट्रिगर दोन नुसार महाराष्ट्रातील सुमारे १८० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १० तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळगस्त तालुक्यांना विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वनविभागाने नुकताच घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळसदृश्य १८० तालुक्यांतील शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या  शालेय व महाविद्यार्थ्यालयीन विद्यार्थ्यांना सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रासाठी १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे.शहरी भागासाठी अनुज्ञेय नाहीसदर योजना १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ या सत्रासाठी लागू आहे. मात्र ही पास नुतणीकरण करणाऱ्यांना केवळ ग्रामीण बससेवेकरिता अनुज्ञेय राहणार तर शहरी बससेविकरिता ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.पूर्वीच्या पासधारकांनाही लागूराष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत होती. मात्र आता दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास नुतनीकरण करताना उर्वरीत ३३.३३ टक्के रक्कमही सुट देण्यात आली आहे.