शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषातून फसवणूक

By admin | Updated: August 10, 2014 22:55 IST

विमा पॉलिसीच्या नावावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून विमा अभिकर्त्याने वृद्धाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्धाने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूकीचा

चंद्रपूर : विमा पॉलिसीच्या नावावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून विमा अभिकर्त्याने वृद्धाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्धाने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.भद्रावती येथील ज्येष्ठ नागरिक दौलत नारायण पवार यांनी आपल्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी पत्नीच्या नावे एलआयसी कार्यालय शाखा वरोरा येथे २५ मार्च २००८ ते मार्च २०११ पर्यंत साडेचार लाख रुपये घराशेजारीच राहणाऱ्या विमा अभिकर्ता मुर्लीधर विष्णूपंत कुलकर्णी यांच्यामार्फत जमा केले.मात्र, मुर्लीधर कुलकर्णी यांनी आपल्या स्वार्थापोटी जास्त व्याज मिळते, असे सांगून दोन लाख तीस हजार रुपये एलआयसी शाखेत आणि उर्वरीत दोन लाख तीस हजार रुपये दामदुप्पट होईल असे सांगून दुसऱ्या बँकेत भरत असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांच्याबद्दल शहरात आणि इतर ठिकाणी त्यांनी केलेल्या फसवणूकीच्या चर्चा होत्या. त्यामुळे शंका आल्याने एप्रिल २०१३ मध्ये दिलेल्या चार धनादेशाची रक्कम परत करण्यास त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी टाळाटाळ करुन मूळ रक्कम देण्यास एक वर्ष लावले. दुप्पट व्याज तर मिळालेच नाही. २५ एप्रिल रोजी मिळालेल्या कागदपत्रांद्वारे दोन लाख वीस हजार रुपये कुलकर्णी यांनी केव्हाच लंपास केल्याचे निदर्शनास आले. एलआयसीमध्ये जमा असलेली रक्कम दोन लाख तीन हजार रुपये तसेच इतर दोन विमा पॉलिसीमधून ६१ हजार दोनशे पन्नास रुपयांचा कुलकर्णी यांनी गैरव्यवहार करुन फसवणूक केली आहे. या रकमेतून केवळ ६० हजार रुपये २१ एप्रिल २०१४ ला परत मिळविले. परंतु दोन वर्षापूर्वी कर्ज म्हणून काढलेल्या विमा पॉलिसीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दामदुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या कुलकर्णी यांच्या विरुद्ध दौलत पवार यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात ३ आॅगस्टला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर कारवाई करुन रक्कम परत मिळवून देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)