शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

खोटे दस्तावेज तयार करून केली फसवणूक

By admin | Updated: March 27, 2015 00:50 IST

तालुक्यातील चौगान येथील शेतजमिनीच्या बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्रर कार्यालयात नोंदणीही केली.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील चौगान येथील शेतजमिनीच्या बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्रर कार्यालयात नोंदणीही केली. परंतु फेरफार करताना पकडल्या गेल्याने चौगानचे तलाठी अनुरथ नथ्थू नारनवरे यांच्या तक्रारीवरून गणेश विनोद नखाते (रा.चकबोथली) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. परंतु गुरूवारी सायंकाळपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. तालुक्यातील चकबोथली या गावातील भूमापन क्रमांक ३३ मधील दोन हेक्टर ३० आर ही शेतजमीन आरोपी गणेश विनोद नखाते याच्या वडीलाच्या नावे होती. शेतजमिन विकण्यासाठी वडील तयार नसल्याने आरोपी गणेशने चक्क खोटे स्टॅम्प, खोटे शपथपत्र तयार करून सातबाऱ्यावर आपल्या नावाची नोंद करून घेतली. एवढेच नाही तर एका इसमाला १३ मार्च २०१४ रोजी आठ लाख ६० हजार रुपयांना विकून ब्रह्मपुरीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीची रजिस्ट्री करून घेतली. खोटे शपथपत्र, खोट्या सह्या व शिक्के बनवून तहसिलदारांनी व दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी बारकाईने न पाहता त्यावर स्वाक्षऱ्या करून नोंदणीची प्रक्रीया पूर्ण केल्याने संबधित अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. नोंदणीनंतर जेव्हा ही शेतजमिन घेणाऱ्यांनी फेरफार करण्यासाठी चौगानचे तलाठी नारनवरे यांचेकडे कागदपत्रे सुपूर्द केली. तेव्हा तलाठ्याची संपूर्ण कागदपत्राची तपासणी केले असता, तलाठ्याच्या लक्षात आले की, मूळ रेकॉर्डवर संबंधित जमिन वडिलांचे नावे असून सातबारा मात्र आरोपी गणेशच्या नावे कसे काय? यावरून संशय येताच त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)