शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:37 IST

कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडलेल्या. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल कामगीरी करून जिल्ह्याचे नाव उंचावले.

ठळक मुद्देपरिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा : चंद्रपूर पोलीस दलाची कामगीरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडलेल्या. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल कामगीरी करून जिल्ह्याचे नाव उंचावले.नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१८ चे यजमानपद यंदा वर्धा जिल्हा पोलीस दलाकडे होते. २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०१८ दरम्यान ही स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्रातील नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश होता. सहाही जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस खेळाडू मिळून एक हजार खेळाडूंची उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, हँडबॉल, वेट लिफ्टींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, स्विमींग, मॅराथॉन, क्रॉस कंट्री व कबड्डी आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर पोलीस दलाने जनरल चॅम्पियनशिप पटकावित अव्वल स्थान पटकाविले. फुटबॉल द्वितीय, हॉकी प्रथम, स्विमींग प्रथम, वेटलिफ्टींग प्रथम, बॉक्सींग प्रथम, कुस्ती प्रथम, ज्युडो द्वितीय, हॉलीबॉल तृतीय, कबड्डी प्रथम, बास्केटबॉल प्रथम, हँडबॉल तृतीय, खो-खो चतुर्थ, क्रॉस कंट्री प्रथम, अ‍ॅथलेटीक्स द्वितीय असे विजयाचे स्वरूप होते. एकूण १८७ गुणांची कमाई करून सलग चौथ्यांदा जनरल चॅम्पियनशिप मिळविण्यात जवानांना यश आले. बुधवारी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे व अन्य अधिकारी उपस्थित होते. सरावामुळे हे यश मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.