शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षानंतर मिळाला डोंगर्लाच्या शेतकºयांना मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:22 IST

तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकºयांच्या शेतजमिनी गावातीलच तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकºयांच्या शेतजमिनी गावातीलच तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र लघु सिंचाई विभाग शेतकºयांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यास दिरंगाई करीत होता. शेतकयांच्या न्याय हक्कासाठी विदर्भ स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण जांभूळे यांनी केलेल्या अविरत संघर्षाला अखेर चौदा वर्षानंतर यश आले. चिमूर दुय्यम निबंधक कार्यालय येथे शेतकºयांच्या शेतीच्या मोबदल्यांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.अतीरीक्त तहसील भिसीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या डोंगर्ला येथे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत लघुसिंचन विभागाकडून सन २००३ ला तलावासाठी ३२ शेतकºयांच्या जमिनी संपादित करून २००५ मध्ये तलावाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र शेतकºयांना १४ वर्ष शेतीचा मोबदला मिळाला नव्हता. यादरम्यान, यातील काही शेतकºयांचा मृत्यूसुध्दा झाला आहे.शेतजमिनीच्या मोबदल्यासाठी स्वाभीमानी संघटनेचे नारायण जांभूळे यांनी शासनाला पत्रव्यवहार केला. आंदोलन, धरणे, लघू सिंचाई विभागाला कुलुप ठोकले. उपोषण केले. अविरत संघर्ष सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. डोंगर्ला येथील बारा शेतकºयांना एक करोड ५ लाख ६३ हजार ६१६ रुपये धनादेशव्दारे वितरित करण्यात आले.यात नथ्यु कवडू चौधरी ५ लाख ८१ हजार, कचरू रामकृष्ण चौधरी ५ लाख ६० हजार, हेमराज बाजीराव चौधरी २ लाख ८६ हजार, मानिक लक्ष्मण चौधरी १७ लाख ६३ हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वाटप दुय्यम निबंधक कार्यालयात अभियंता एम. बी. दिकुंडवार, नारायण जांभूळे, लिपीक रमेश कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित शेतकºयांना मोबदला सध्या मिळालेला नाही. काही दिवसातच त्यांच्याही शेत जमिनीचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जांभूळे यांनी दिली.