शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे चारवटचा कायापालट

By admin | Updated: May 29, 2017 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती.

चंदनसिंह चंदेल : दोन कोटींच्यावर विकास कामाचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील चारवट गाव इरई नदीच्या पुरामुळे पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वेढले जात होते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी होती. पुनर्वसन प्रक्रिया झाली. परंतु वस्तीचा विकास रखडला होता. चारवट पुर्नवसित गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसीत चारवटचा कायापालट होण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पुर्नवसित चारवट येथे शुक्रवारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर पंचायत समतीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी, उपसरपंच गुणिता गौरकार, मुर्लीधर गौरकार, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, बांधकाम उपअभियंता पी.पी. जोशी, अभियंता दोरखंडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंदनसिंह चंदेल म्हणाले की, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून शासनाकडे चारवट गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानुसार २००६ मध्ये गावाचा पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. पुनर्वसित गावाचा विकास करण्यासाठी ६ मार्च २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करून २ कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, खडीकरणाचे काम, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५३ लाख २५ हजार ७६६ रुपये ार्च करून गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. एकूण २ कोटी ७१ लाख ५३ हजार ५८३ रुपये खर्च करून पुर्नवसित चारवटचा सर्वांगसुंदर विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे होत असल्याचे चंदेल यांनी सांगितले.नगराध्यक्ष हरीश शर्मा, सभापती गोविंदा पोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.