शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात चार ठिकाणी घरफोड्या

By admin | Updated: May 11, 2016 01:20 IST

चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. एका किराणा दुकानासह चार

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. एका किराणा दुकानासह चार कुलूप बंद घरांना लक्ष्य करीत या चोरट्यांनी हात साफ केला. यामुळे परिसरात कमालिची दहशत निर्माण झाली आहे. किराण दुकान वगळता अन्य घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. हवेली गार्डन चौकात श्याम जेठवाणी यांचे किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सदर दुकानाचे शटर लोखंडी सळाखीने वर उचलून आत प्रवेश केला व दुकानातील रोख २५ हजारांची रक्कम लंपास केली. त्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा हवेली गार्डनकडे वळविला. अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील तिसऱ्या माळ्यावर राहणारे अमित ठाकूर यांच्या प्लॅटचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर रामलक्ष्मण अपार्टमेन्टमधील गिरीश डोर्लीकर, निशिगंधा अपार्टमेन्टमधील नारायण बनकर यांचीही घरे चोरट्यांनी फोडली. मात्र घरात चोरट्यांना काहीही मिळाले नाही. विशेष म्हणजे ही सर्व घरे कुलूप बंद होती. आजुबाजुच्या दारांच्या कड्या बाहेरून बंद करून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हवेली गार्डन चौकातील श्याम जेठवाणी यांच्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. मात्र घटनेच्या रात्री दुकानाबाहेरील सर्व लाईट बंद करण्यात आल्याने सीसीटीव्ही कॅमेरा निरूपयोगी ठरली. मंगळवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर श्याम जेठवाणी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीपसिंह परदेसी यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत चोरट्यांचा मागमूस लागला नव्हता. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना द्यावी, असे आवाहन रामनगरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह राजपूत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)