शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

मध्यम प्रकल्पात चार टक्के जलसाठा

By admin | Updated: June 1, 2016 01:47 IST

टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वेगाने घसरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मध्यम,

पाण्याची पातळी खालावली : लघु प्रकल्पातही जलसाठा घटलाभंडारा : टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वेगाने घसरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व माजी मालगुजारी तलावांमध्ये सरासरी केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी भीषण पाणीटंचाईचे संकेत देणारी आहे. जिल्ह्यात लघू पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार प्रकल्पांमध्ये १.७३९ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४.०६ इतकी आहे. चांदपूरमध्ये ५.०४२, बघेडामध्ये ६़२३६ टक्के पाणी आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर (बोथली) आणि सोरणा प्रकल्पामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. भंडारा जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या लघु प्रकल्पांमध्ये एकूण ४.३३१ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ८.०९ इतकी आहे. ३१ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांमध्ये जलसाठा शुन्य टक्के आहे. २८ माजी मालगुजारी तलावात सद्यस्थितीत २.५३३ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ९.९८ आहे. २८ माजी मालगुजारी १४ तलाव कोरडे आहेत. (प्रतिनिधी)