शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार टक्के नागरिक नैराश्यग्रस्त

By admin | Updated: April 7, 2017 00:57 IST

नैराश्य हा जगात सर्वात जास्त नागरिकांना ग्रासलेला आजार आहे. आजच्या परिस्थितीत जगात जवळपास ३२ कोटी २० लाख नागरिक हे नैराश्याने पीडित आहेत.

स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक : नैराश्यामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ परिमल डोहणे  चंद्रपूर नैराश्य हा जगात सर्वात जास्त नागरिकांना ग्रासलेला आजार आहे. आजच्या परिस्थितीत जगात जवळपास ३२ कोटी २० लाख नागरिक हे नैराश्याने पीडित आहेत. दिवसेंदिवस नैराश्याच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हा एक चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा करत असते. यादरम्यान प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आरोग्याच्या विषयांवर जनजागृती करण्यात येत. यावर्षी संघटनेच्यावतिने जागतिक आरोग्य दिनाचेनिमित्य ‘नैराश्य’ हा विषय ठेवण्यात आला असून जनजागृती करण्यात येत आहे. दिवसेंदिवस नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. एकुण लोकसंख्येच्या ४.५ टक्के नागरिक नैराश्याने ग्रस्त आहेत. त्यातील भारतातील जवळपास सहा करोड नागरिक नैराश्याने पीडित आहेत. मागील १० वर्षांत नैराश्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नैराश्यामुळे नागरिकांचे काम करण्याची क्षमता कमी होते.सततच्या नैराश्यामुळे जवळपास आठ लाख नागरिक आत्महत्या करतात. विशेष म्हणजे १५ ते २९ या वयोगटात आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हे नैराश्य आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या नागरिकांने उपचार घेणे गरजेचे आहे. वाढत्या नैराश्याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने मनोविकार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, नैराश्यावर किंवा मानसिक रोगांवर उपचार घेण्याचे प्रमाण हे अर्धापेक्षा कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक आजाराबाबत नागरिकांच्या मनात असलेला गैरसमज होय. लोकांना मानसिक आजार असणे अप्रतिष्ठेचे वाटते. त्यामुळे बहुतेकजण आपल्याला मानसिक आजार आहे, हे नाकारतात. मात्र मानसिक आजार हा कुणालाही होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण शारीरिक आजारावर उपचार करतो. त्याचप्रमाणे नैराश्य किंवा मानसिक आजरावरही उपचार करणे गरजचे आहे. त्यासाठी मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.