शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

वैद्यकीय महाविद्यालयासाठी चार आॅप्शन

By admin | Updated: January 29, 2015 23:02 IST

चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी जागेचा तिढा सुटता सुटत नाही. प्रशासनाने सुचविलेल्या जागेवर आक्षेप असल्याने हे वैद्यकीय महाविद्यालय नेमके होणार तरी कुठे,

जनतेच्या विकासाभिमुख जागा द्या : नरेश पुगलियांनी सुचविले चंद्रपूर : चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी जागेचा तिढा सुटता सुटत नाही. प्रशासनाने सुचविलेल्या जागेवर आक्षेप असल्याने हे वैद्यकीय महाविद्यालय नेमके होणार तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी शहरालगतच्या चार जागा सुचविल्या. सर्वसामान्य जनतेच्या सोईच्या तसेच पर्यावरण आणि वाहतुकीच्या दृष्टीने या चारही जागांचा विचार जनतेनेच करावा, असे सांगत त्यांनी जनतेच्या दरबारत हा चेंडू ठेवला आहे.भविष्यात उदयास येऊ पहाणाऱ्या नव्या चंद्रपुरातील म्हाडा वसाहतीमधील उपयोजनासाठी राखीव जागा, वनरजिक महाविद्यालयातील जागा आणि वास्तू, प्रशासनाने सुचविलेला पागलबाबा नगरातील शासकीय भूखंड आणि बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डण पुलालगतची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील जागा गुरूवारी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. म्हाडा वसाहतीमधील जागा नव्या चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. म्हाडा परिसरात वेगवेळ्या उपयोजनेसाठी भुखंड आरक्षित आहेत. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास नव्या शहराचा विकास झपाट्याने होईल, वाहतुकीची साधने सहज उपलब्ध होतील आणि प्रदुषणमुक्त वातावरण मिळेल हे त्यांनी लक्षात आणून दिले. वनरजिक महाविद्यालयातील जागा दोन वर्षांपूर्वीच आपण शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र या परिसरात जाणिवपूर्वक वनविभागाशी संबधित कार्यालये घुसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. असे असले तरी वित्त, वन आणि नियोजन हे महत्वपूर्ण विभाग सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असल्याने लिजवर ही जागा मिळणे कठीण नसल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या पागलबाबा नगरातील जागा एमईएलपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. वाहत्या वाऱ्यासोबत फेरो मॅग्नीजची राख या परिसरात उडत असते. लागूनच अर्धा किलोमीटरवर मनपाचे कचरा डंपींग यार्ड आहे. बाहेरगावच्या नागरिकांना यथे पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार असल्याने ही जागा वैद्यकीय महाविद्यालासाठी कशी सोईची ठरू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या जागेवर मोठाले खड्डे असल्याने ते बुजविण्यासाठी आणि पुलाच्या बांधकामासाठी शासनाने ६५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. अन्यत्र महाविद्यालय झाल्यास हा खर्च वाचणार आहे.डायट कॉलेजच्या परिसरातील जागाही त्यांनी सुचविली. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाच्या ताब्यात ही जागा आहे. परिसरात इमारतीही आहेत. नॉर्मल स्कूलची जागाही मोकळी असल्याने प्रशासनापुढे त्यांनी या जागेचाही पर्याय ठेवला. (जिल्हा प्रतिनिधी)