शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:14 IST

दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभागाची दक्षता : रस्ते व पूर परिस्थितीमुळे उपाययोजना

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते. याची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये एकाचवेळी चार महिन्याचे धान पोहोचविले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती किंवा रस्ते वाहून गेले तरी नागरिकांना गावातच धान्य मिळणार आहे.संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क दरवर्षी तुटत असते. तर काही गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने मुसळधार पावसात अस्तित्वातील रस्ताही दिसेनासा होते. अशा स्थितीत वाहनाने धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पोहोचविले जाते. जिल्ह्यात अशी १५ गावे असून आतापर्यंत १३ गावांना एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले आहे.संपर्क तुटणाºया गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील वढा, आरवट, शिवणी चोर, पायली भटाळी, राजुरा तालुक्यातील कोलगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील कुलथा, पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव, टोक, गंगापूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती व मूल तालुक्यातील कोरंबी या १३ गावांचा समावेश असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.तूर डाळीसाठी सक्ती करू नकास्वस्त धान्य दुकानांमार्फत सध्या तूर डाळ वाटप केली जात आहे. याआधी ५५ रूपये किलो दराने डाळ विकली जात होती. परंतु, शासनाने नुकतीच तूर डाळीची किमंत कमी केली असून आता ३५ रूपये किलो दराने डाळ वाटप केली जात आहे. मात्र ग्रामीण भागात तूरीचे उत्पादन बºयापैकी होत असल्याने अनेक लाभार्थी तूर डाळ घेत नाही. अशावेळेस स्वस्त धान्य दुकानदार डाळ घेणार तरच गहू, तांदूळ मिळेल असे सांगत मागणी नसतानाही लाभार्थ्यांना तूर डाळ सक्तीने देत आहेत. मात्र तूर डाळीसाठी लाभार्थ्यांना दुकानदारांनी कुठलीही सक्ती करू नये, त्यांच्या मागणीनुसारच तूर डाळ द्यावी, मागणी नसेल तर देऊ नये, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय मिस्कीन यांनी म्हटले आहे.१३ गावे ८ हजार ५३७ लाभार्थीपावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १३ गावांची लोकसंख्या ८ हजार ५३७ असून १९७७ शिधापत्रिकाधारक आहेत. यात ३५० एपीएल शिधापत्रिकाधारक, ६२७ अंत्योदय तर १ हजार प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना ९३९.९६ क्विंटल गहू तर ८४४.४७ क्विंटल तांदूळ असा १७८४.४३ क्विंटल धान्य पोहचविण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.पूर परिस्थितीमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेने जिल्ह्यातील १३ गावांत धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे या गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पावसाळ्यापूर्वीच पोहचविले जाते. संपर्क तुटणाºया १३ गावांना धान्य पुरवठा करण्यात आला आहे.- संजय मिस्कीनजिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.