शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा चालकांना साडेचार लाखात घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:24 IST

चंद्रपुरातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रुपये साडेचार लाख एवढया किमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने २८ डिसेंबर २०१८ रोजी म्हाडाला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आॅटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्वास आली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : म्हाडा पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रुपये साडेचार लाख एवढया किमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने २८ डिसेंबर २०१८ रोजी म्हाडाला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आॅटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्वास आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे साडेचार लाख रुपये एवढया कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या आॅटोरिक्षा चालकांच्या मागणीचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात २० नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा कॉलनीतील घरे साडेचार लाखांपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन चंद्रपूर येथील आरक्षण क्रमांक ७९ व ८० मौजा कोसारा येथे आॅटोरिक्षा चालकांकरिता नागपूर मंडळातर्फे प्रस्तावित घरकुल योजनेबाबत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सदर सदनिकांची किंमत सात लाख ५६ हजार प्रति सदनिका अशी दर्शविण्यात आली आहे. सदर किंमत रुपये साडेचार लाख इतकी करण्यात यावी, अशी मागणी आॅटोरिक्षा चालकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने रेटली होती. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर मागणी पुर्णत्वास आली आहे. सदर मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.