शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी करणारे चिमूरचे चार नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

अपक्ष नगरसेवक जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व भाजपचे नितीन कटारे हे चार नगरसेवक अपात्र झाल्याने चिमूरच्या ...

अपक्ष नगरसेवक जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व भाजपचे नितीन कटारे हे चार नगरसेवक अपात्र झाल्याने चिमूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

चिमूर नगर परिषदच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीन नगरसेवकांनी भाजपशी आघाडी करून आमदार बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन होती. दि १० एप्रिल २०१८च्या सर्वसाधारण सभेत चिमूर पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरण कार्यान्वित यंत्रणा म्हणून हस्तांतरित करण्यासाठी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश पक्षाने जारी केला होता. परंतु भाजप आघाडीतील जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व नितीन कटारे यांनी पक्षादेशाचे झुगारला. त्यांना १९६५ च्या कलम १६ व १९८६ च्या कलम (३) (१) (अ) व कलम ७ नुसार अपात्र ठरविण्याबाबतची तक्रार गटनेत्या छाया कंचर्लावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ३ ऑगस्ट २०१९ रोजी निर्णय देत त्या चार नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरुद्ध चारही नगरसेवकांनी मंत्रालयात अपील दाखल केले होते. नगरविकासमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन प्रकरण सुनावणीस ठेवले होते. ५ मार्च २०२१ला नगर विकास मंत्रालयात अंतिम सुनावणी झाली. यामध्ये जयश्री निवटे, तुषार शिंदे, तुषार काळे व नितीन कटारे यांचा अपील अर्ज अमान्य करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दि. ३ ऑगस्ट २०१९च्या आदेशास दिलेली स्थगिती उठविली. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८६ तील कलम (३) नुसार दाखल अर्जाबाबत केलेला पारित केलेला ३ ऑगस्ट २०१९ रोजीचा आदेश कायम ठेवण्यात येत आहे, असा निर्णय दिला.

या निर्णयामुळे ते चार नगरसेवक अपात्र ठरले आहे. पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढता येणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. चिमूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

विशेष म्हणजे हे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागाचे आरक्षण बदलले आहे. यातील काहीजण दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची इच्छा बाळगून होते. या आदेशाने त्यांचेही स्वप्न आता भंगले आहे. गटासोबत बंडखोरी करून पक्षाचा आदेश झुगारने त्यांना महागात पडले आहे.