शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ‘दामिनी’ पथकाची स्थापना

By admin | Updated: March 4, 2016 01:02 IST

महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकारातून ...

सशस्त्र कर्मचाऱ्यांचा सहभाग : रोडरोमियोंच्या कारवायांवर चाप लावणारचंद्रपूर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महिलांचे संरक्षण करण्यासाठी ‘दामिनी’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक आता रोडरोमियोंच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तरूणींची छेड काढणाऱ्या टारगटांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून हे पथक शहरात कार्यरत होणार असून त्यामुळे आता महिला-तरूणींची छेड काढणाऱ्यांना सावध रहावे लागणार आहे. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक कार्यरत राहणार आहे. महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्याचे काम हे पथक कार्यरत राहणार आहे. अत्याचार व तशा पद्धतीच्या गुन्ह्यांवर आळा घालणे, एखादी युवती वा महिला अडचणीत असेल तर तिला मदत पुरविणे आदी जबाबदार या पथकावर टाकण्यात आली आहे. या पथकात दोन दुचाकी वाहने राहणार आहेत. त्या दुचांकीवर प्रत्येकी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एक चारचाकी बोलेरो वाहनदेखील या पथकात राहणार असून त्यात एक महिला पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस कर्मचारी व दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सशस्त्र राहणार असून या पथकाला अत्याधुनिक कॅमेरा पुरविण्यात आला आहे. हे पथक चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, उद्याने तसेच उद्यानाच्या ठिकाणी २४ तास गस्त घालणार आहे. (प्रतिनिधी)